फिनिक्स ह्यांच्या
माझ्या समजुतीप्रमाणे प्रत्येक शेरामधली प्रत्येक ओळ ही स्वतंत्र असली पाहिजे.
ह्या वाक्यातील "स्वतंत्र" ह्या शब्दाकडे तुमचे लक्ष वेधू इच्छितो. स्वतंत्रचा अर्थ स्वायत्त, ज्या ओळीस पुढच्या ओळी/ळींच्या अर्थाच्या आधाराच्या टेकूची गरज नाही अशी ओळ. प्रदीप कुलकर्णींचा फिनिक्स ह्यांनी उद्धृत केलेला शेर काय किंवा मी उदाहरणादाखल दिलेले शेर काय, ह्यातील कोणत्याही शेराची पहिली ओळ स्वतंत्र नाही. हे सर्व शेर ढोबळमानाने कंपाऊंड सेंटेन्सेस आहेत व त्यांच्या पहिल्या ओळी क्लॉज आहेत. दुसऱ्या ओळीवाचून त्या अपूर्ण ठरतात व म्हणूनच स्वतंत्र ठरू शकत नाहीत. अर्थात हे विवेचन 'स्वतंत्र' ह्या शब्दाचा सर्वमान्य अर्थ लक्षात घेऊन केलेले आहे. मु्दलात तुम्ही जर ह्या शब्दाची काही दुसरी व्याख्या, दुसराच अर्थ मानत असाल तर गोष्ट वेगळी. तेव्हा (नेहमीप्रमाणे) इथेही आपले दुमत आहे व राहील.
      शेराची पहिली ओळ स्वतंत्र असावी की  नाही ह्याविषयी मला निश्चित नियम माहीत नाही हे मी माझ्या पहिल्या प्रतिसादात म्हटले आहेच. पण सहज शोधल्यावरही सापडलेली व उद्धृत केलेली उदाहरणे बघता निदान अशा प्रकारच्या शेर-रचनेला प्रत्यवाय नसावा असे वाटते इतकेच माझे प्रतिपादन आहे.