प्रत्येक शेरामधली प्रत्येक ओळ ही स्वतंत्र असली पाहिजे.

वरील वाक्यात स्वतंत्र या शब्दातून ती ओळ अर्थपूर्ण असली पाहिजे म्हणजेच त्या ओळीचा अर्थ समजण्यासाठी दुसऱ्या ओळीवर अवलंबून राहावे लागू नये असा अर्थ अभिप्रेत असावा का?
पण असा अर्थ अपेक्षित असल्यास, तेही जरा विचित्रच वाटते. मुळातच गजलेतील प्रत्येक शेर ही स्वतंत्र कविता असते. त्या सिंगल सेल्फ सपोर्टेड युनिटमधल्या ओळीसुद्धा सिंगल सेल्फ सपोर्टेड असाव्यात असे म्हणणे बरोबर नाही असे वाटते. जो काही अर्थ त्या शेरातून पएक्षित आहे, त्यासाठी शेरातील दोन्ही ओळी गरजेच्या असाव्यात आणि वाचताना दोन्ही ओळी एकत्र आणि एकमेकींच्या संदर्भानेच वाचल्या जाव्यात. मग हे प्रत्येक ओळीला स्वतंत्रपणे अर्थ असला पाहिजे असे म्हणणे कशासाठी?