संतोष कागवटे यांच्या एकुणच प्रतिसादावरुन वाटतं की ते प्रेम विवाहाच्या विरुद्द आसावेत. हे त्यांचं वैयक्तीक मत आहे. याबाबत माझ काहीही म्हणण नाही. पण मला वाटते की आपण आपल्या आवडीचा जोडीदार निवडणे यात काय वाईट आहे?

आईवडीलांच्या विचाराच्या विरोधात नाही परंतु त्यांची आपल्या मुलांसाठी जी उपकाराची भावना असते ती नको. उपकार यासाठी की बरेच पालक हे आपण मुलासाठी केलेलं सारखं सारखं बोलुन दाखवतात.... नक्कीच त्यांचे ऋण आपण कधीही फेडु शकत नाही. पण त्या ऋणाचं ओझं नको. हे ही मान्य आहे की प्रत्येक आईवडील हे आपल्या आपत्याच्या भल्याचाच विचार करतात. पण कीती?? एवढा की त्याचं स्वातंत्र्यच काढुन घेतात. अमेरीके प्रमाणे आपण चालावे तसे संस्कार नसवेत  परंतु आपल्या मुला/मुलीने जो साथीदार निवडलाय त्याला न भेटताच तो वाईट कसा काय ठरवु शकता??

अशी कीतीतरी लग्न ही आईवडीलांनी ठरवुन ही असभल झालेली आहेत. आणि जी काही असभल  लग्न आहेत त्याची जबाबदारी ही त्या मुला/मुलीची असते. शेवटी लग्न संसार त्या त्या व्यक्तीला करावा लागतो पालकांनी नाही. मग तो जोडीदार त्याच्या/तीच्या माहीतीतला/आवडीचा असणे काय वाईट आहे. अजुन ही अंतरजातीय विवाह सोडाच पण आपल्या जातीच्या/समाजाच्या बाहेरही लग्न केलेले आजच्या पालकांना चालत नाही. पण का? १८-१९ वर्षाच्या अल्लड प्रेमाला माझाही विरोध आहे. ते प्रेम नसुन एक आकर्षणच असते. पण २५-३० मधील विवाहाला तरी शाहनीशाह करुन मान्यता द्यायला काही हरकत नाही. हे माझं मत आहे.

बाकी... राजवी तुला मी आणखी काय वेगळं सांगु?? ज्याचे त्याचं स्वतंत्र विचार असतात. त्याचा एवढा विचार केलास तर जिवन अजून कठीण होऊन जाईल.

तुला तुझा निर्णय हा योग्य वाटतो ना?  बस!! मग वामनराव पै यांनी सांगीतल्या प्रमाणे  "तुच तुझ्या जिवनाचा शिल्पकार"

टग्या, संजय यांच्याशी अगदी सहमत..............