मराठी भाषेतील 'परिपूर्ण/स्वतंत्र' या शब्दाचा मराठी गझलविश्वात अर्थ वेगळाच आहे की काय अशी शंका भूषण कटककर यांचा प्रतिसाद वाचून आली. तसे असेल तर त्यांनी या शब्दाची व्याख्या अधिक स्पष्ट करून आमच्या ज्ञानात भर घालावी ही विनंती

उदा. पहिली आणि दुसरी ओळ परिपूर्ण/स्वतंत्र असेल तर भूषण यांच्या 'विरहानंतर' या गझलेच्या शेरांतील काही ओळींचा क्रम बदलून

किती माणसे मनात होती उगीच साठून
असेच होते जीव तुझ्यावर जडल्यानंतर

काय घालता भीती जगताना नरकाची?
जे होते ऱ्हुदयामध्ये... तू दिसल्यानंतर

असे केले तर गझलेचा अर्थ तोच राहील का?