आपल्याला मुद्दाच समजला नाही असे मला वाटत आहे.
गजलेच्या शेरांमधील पहिली व दुसरी ओळ ही एक 'स्वतःच अर्थपूर्ण' ओळ असायला हवी अशी एक 'अलिखित' अट पाळली जाते.
आपण जे माझ्या 'विरहानंतर' या गजलेतील शेरातील मिसऱ्यांचे (अन्वयार्थ) लावले आहेत ते जरी पाहिले तरी फार तर असे म्हणता येईल की 'संपूर्ण' शेराचा अर्थ काहीही निघत नाही किंवा हास्यास्पद निघतो. पण त्यातील प्रत्येक ओळीला एक स्वतंत्र अर्थ आहे. दोन ओळींचा एकमेकांशी संबंध नाही हे खरे आहे. ( आपण दिलेल्या उदाहरणांत! ) मात्र, त्या त्या ओळीला एक अर्थ आहे. तसेच, प्रदीप कुलकर्णींच्या सदर व माझ्या अनुभवातील सर्वच शेरांतील प्रत्येक ओळीला स्वतंत्र अर्थ असतोच. 'जर, जे' या स्वरुपाचे शब्द पहिल्या ओळीत आल्याने फक्त त्याचा दुसऱ्या ओळीशी संबंध लागण्याची प्रक्रिया सोपी होते. पण त्याचा अर्थ ओळीला काही अर्थच नसतो असे नाही. 'दे दुःख, आसवांची' या ओळीला काहीही स्वतंत्र अर्थ नाही. मिलिंद फणसे यांनी दिलेल्या उर्दू शायरीतील प्रत्येक ओळीला स्वतंत्र अर्थ आहे. दुसऱ्या ओळीवर 'अवलंबून ' असणे हे वरील अनेक प्रतिसादात 'शेराच्या पुर्ण अर्थासाठी अवलंबून असणे' या चुकीच्या अर्थाने घेतले गेले आहे. 'दे दुःख, आसवांची' ही ओळ शेराच्या संपूर्ण अर्थासाठी नाही तर स्वतःच्याच अर्थासाठी दुसऱ्या ओळीवर अवलंबून आहे. हा फरक जाणणे आवश्यक आहे.
(व्यक्तिगत रोख/संदर्भ व/वा विषयांतर वाटलेला मजकूर संपादित : प्रशासक)