ह्म्म्म, ही शंका आलीच होती. ह्या अशा माणसांच्या बाबतीत बरेचदा असेच
घडते. आईवडील सगळे माहीत असूनही लग्न लावण्याचा प्रयत्न का करतात? आपण
पुरूषच आहोत हे दाखवण्याच्या भानगडीत मुलगा व घरचे एका मुलीचे वाटोळे करून टाकतात.
मला
नेहमी वाटते खरा मुद्दा समाज अशा लोकांशी कसा वागतो इथे आहे. जन्मता
असणारा हा problem समजून घेतला जात नाहीच उलट सतत टिंगल-टवाळीला तोंड
द्यावे लागते. शेवटी परिणिती काहीतरी वाईट घडण्यातच होते.
माणसाला आपली सावली फक्त अंधारातच टाळता येते..... अगदी अगदी.
अरूणदादा, कथा आवडली.