खट्टा मिठा येथे हे वाचायला मिळाले:
बायबलनुसार येशू हा देवपूत्र आहे. तो प्रेषित, म्हणजे मानवजातीच्या उद्धारासाठी परमेश्वराने पाठविलेला प्रतिनिधी आहे. पण काही वर्षांपूर्वी आलेल्या 'दी दा विंची कोड' या कादंबरीने येशूने विवाह केला होता आणि त्यांना मुलंही झाली होती, असा दावा करून येशूला मर्त्य मानवाच्या कोटीत आणलं होतं. तर आता 'द लॉस्ट टॉम्ब ऑफ जीजस' या जेम्स कॅमेरून कार्यकारी निर्माते असलेल्या आणि सिम्चा जॅकोबोविसी यांनी निर्मिती लेखन व दिग्दर्शन केलेल्या माहितीपटाने येशूच्या पुनरुज्जीवनाच्या कथांनाच सुरूंग लावला आहे. नव्या करारातील शुभवार्तांनुसार 'एली एली ला मा सबख्तनी' ...