अगं देवळाबाहेर पण बऱ्याच चपला असतात. म्हणून काय माणसं देवळात जात नाहीत का?
पण शृंगार मुळी शब्दांत नसतोच. तो असतो मनात. गाण्याच्या ओळी ह्याच अदृश्य ’अंतरा’ने जोडलेल्या असतात नाही का?
हे जरा भाबडेपणाचे वाटले. पण बाकी लेख छान. पेटीवर तबला ही कल्पना आवडली. हिरव्या मेंदीचा रानटी आणि निलगिरीचा उग्र वास, चहाचे लालभडक आधण वगैरे बारकावे सुरेख आहेत. लेखन आठवणींच्या मोहोळाला दगड मारणारे वगैरे (उपमा साभार) वाटले.
अवांतरः दोन ओळींत कमी अंतर ठेवण्यासाठी शिफ्ट + एंटर दाबावे.