आभारी आहे चित्तरंजन!
मुसलसल हा शब्द 'मुसलसल' असाच लिहिणे मला सदर रचनेतील मात्रा व लयीच्या दृष्टीने शक्य झाले नाही.
आपल्या प्रतिसादाने बरेही वाटले व फायदाही झाला. तसेच त्या शब्दाचे जातकुळ व काही समानार्थी शब्दही समजले.
( मुसलसल हा शब्द गजलेमध्ये 'एकाच विषयावरचे सगळे शेर' या अर्थासाठी आहे या समजुतीतून मी तो शेर रचला. आपण दिलेल्या शब्दांप्रमाणे जर त्याचा अर्थ होत असेल तर माझा शेर चुकला असे म्हणावे लागेल. आपण हे स्पष्ट केलेत यासाठी मनापासून आभारी आहे. )
( मुसळ नक्कीच म्हणायचे नव्हते.. हा हा हा! )
बाकी रचना कशी वाटली याबाबतही आपले मत मिळाले तर प्रोत्साहन मिळेल.
धन्यवाद!