माझ्या वरील प्रतिसादात वापरल्याप्रमाणे 'अनुवांशिक' असा लिहिलेला शब्द बरोबर, की 'आनुवंशिक' बरोबर? नक्की नियम काय?

'राजनैतिक'सारखे 'अनुवांशिक' हे बरोबर असावे अशी शंका आहे (तसेच वाचले आहे असेही वाटते, पण या क्षणी खात्री नाही.), परंतु 'पारंपरिक' किंवा 'पारिवारिक' सारख्या शब्दांमुळे गोंधळ होत आहे. अर्थात 'परंपरा' किंवा 'परिवार' हे कदाचित जोडशब्द नसावेत असे वाटते, पण खात्री नाही. (चूभूद्याघ्या.)

पण मग जशी 'अनुवंश' = 'अनु' + 'वंश' अशी फोड कदाचित करता येईल (हे बरोबर आहे का? 'अनुवंश' याला काही अर्थ आहे का?), तशीच 'इतिहास' = 'इति' + 'हास' अशी फोड करता यावी असे वाटते. मग 'इतिहास'पासून जर 'ऐतिहासिक', तर 'अनुवंश'पासून 'आनुवंशिक' व्हावे का?

की 'अनुवंश' असा काही शब्द नसून 'अनु' + 'वांशिक' = 'अनुवांशिक' असे काही होते?

तज्ज्ञांनी कृपया नियमासह आणि सोदाहरण खुलासा करावा.