श्री टग्या यांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! त्याला मी सुद्धा मम म्हटले आहे.
संतोषजी सगळ्याच गोष्टींचा इतका खोलवर विचार नाही हो लोक करत. अ, ब, क, ड, मधे जे काही लिहीलंय त्याचा खरचं लोक विचार करतात??? आणि मग लग्न करतात??
लग्न हे योगायोगाने होते. मग प्रेम विवाह असो वा आयोजीत.... असा शास्त्रशुद्ध अनुमान काढुन लग्न होत नसतात.
E] सज्जनांचे, पुण्यवंतांचे आशिर्वाद /शुभेच्छा / शिव्या / शाप, फळतातच.
शुभकार्यारंभी काय घ्यायचे हे ज्याने त्याने ठरवावे.
आईवडीलांनी (हेच सज्जनही/पुण्यवंतही) आपलं संपुर्ण आयुष्य हे आपल्या मुलाच्या चांगल्या भविष्या साठी घालवलं... जे मुलांच्या शिक्षणापासुन ते त्यांच्या नोकरी/व्यावसाया पर्यंत, त्यांनी फक्त आशिर्वादच दिलेत. मग आयुष्याचा महत्वाचा निर्णय जर का मुलांनी घेतला तर मात्र शिव्याशाप .... पण का? याला सुद्दा जर का आशिर्वाद दिलेत तर काय बिघडणार आहे? शेवटी चांगल/वाईट होणं हा त्या मुला/मुलीच्या नशिबाचा भाग आहे. असं असेल तर आतापर्यंत जे आशिर्वाद दिले ते फुकटच गेले.....
'कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही' हे जरी खरं असंल तरी शेवटी जो नविन आयुष्य सुरु करत असतो त्याला आपल्या आईवडीलाच्या शिव्याशाप सतत मनात घोळत असतात. कारण त्या फळु नये ही भीती असते म्हणुनच.