संतोषराव,

या चर्चाप्रस्तावात माझे मत आपल्या मतापेक्षा वेगळे असले तरी मला आपल्या मतांचा आदर आहेच. कारण प्रत्येकाची वैयक्तिक मते ही त्या व्यक्तीच्या स्वतःच्या विचारसरणीला पटलेली असतात (असा माझा समज आहे).

परंतु आपल्या प्रत्येक प्रतिसादाची मांडणी वाचायला आणि समजून घ्यायला फारच अवजड आणि अवघड वाटते. आपली मते व्यवस्थापनशास्त्रातील 'सिद्धांताच्या स्पष्टीकरणा'प्रमाणे वाटतात. जे एकदा(खरं तर अनेकदा) वाचूनही माझ्यासारख्या सामान्य वाचकांना समजून घेता येत नाहीत.

आपली मते जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल. त्याकरता आपण त्यांना सर्वसामान्य लेखी पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करावा अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे.

कृपया गैरसमज नसावा.