या कवितेतला टाहो, अनिर्बंध जीवन जगून झाल्यावर जीवनाच्या मध्यावर
सिंहावलोकन करीत बसलेल्या एका हतप्रभ माणसाचा आहे.

आपल्या जीवनप्रवासांत कांही वेळा अत्यंत गुणी परंतु भरकटलेली आणि
भरकटीत स्वत:चे जीवन स्वतःच विस्कटून घेतलेली माणसे दिसतात. या
कवितेत आक्रोश करणारा असाच एक जीव आहे. व्यावहारिक जगाच्या
गणतीत सर्व पातके करून बसलेला. त्यामुळे समाजात मान नाही. वर करून
दाखवायला तोंड नाही. म्हणून कबंध. या शब्दाचा वृंदा गोडबोले यांनी
सांगितलेला अर्थ बरोबर आहे. अशा माणसाला कबंधासारखे लटकणे
क्रमप्राप्तच आहे.