या चर्चाप्रस्तावात माझे मत आपल्या मतापेक्षा वेगळे असले तरी मला आपल्या मतांचा आदर आहेच. कारण प्रत्येकाची वैयक्तिक मते ही त्या व्यक्तीच्या स्वतःच्या विचारसरणीला पटलेली असतात (असा माझा समज आहे).

----- मूळात माझे प्रतीसाद वाचल्या जातात याचे माझे मलाच कौतूक वाटत आहे. अगदीच केराची टोपली दाखवण्याच्या लायकीचे ते नसतात हे समजून आश्चर्य वाटते.

परंतु आपल्या प्रत्येक प्रतिसादाची मांडणी वाचायला आणि समजून घ्यायला फारच अवजड आणि अवघड वाटते. आपली मते व्यवस्थापनशास्त्रातील 'सिद्धांताच्या स्पष्टीकरणा'प्रमाणे वाटतात. जे एकदा(खरं तर अनेकदा) वाचूनही माझ्यासारख्या सामान्य वाचकांना समजून घेता येत नाहीत.

----- असे तुम्हांस / कोणासही, वाटणे शक्य आहे कारण प्रतीपादनांस क्लिष्टता, अनेक संकल्पना / संकेत / आशयघनता / गृहितके,   यांच्या मिश्रणाने प्राप्त होते. अशी एखादी नवीन संकल्पना,   वाचकाला, जुन्या संकल्पनांच्या कक्षा, आशय, संज्ञा,   संकेत, गृहितके माहिती नसतील तर सगळेच अगम्य वाटते.

आपली मते जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल. त्याकरता आपण त्यांना सर्वसामान्य लेखी पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करावा अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया गैरसमज नसावा.

------ धन्यवाद. अशी अपेक्षा करणे म्हणजे, श्रीकृष्णाला गीता सांगतानाच ती    " सार्थ, सोदाहरण व सस्पष्टिकरण सांग " असे म्हणणे होय. [ मी श्रीकृष्ण मुळीच नाही, अर्थ वस्तुनिष्ठतेने घ्यावा. ] त्यामुळे गौण मुद्दा महत्वाचा व मुख्य मुद्दा गौण ठरण्याची शक्यता वाढते.
 उदा: माझ्या  " विवाह विश्लेषण :........ " या प्रतीसादात, क्वॉलिटी, रीलायबीलीटी, दानव/यक्ष/ गंधर्व विवाह पद्धती, उपग्रह प्रक्षेपण नीती, कृत्रीम रेतन, युजेनीक्स इत्यादी संज्ञा , संकेत, संकल्पनांचे विग्रह करत बसलो तर मुख्य मुद्द्याचे काय होईल? प्रतीसाद रटाळ होइल की रसपुर्ण?

" तुमच्या विनंतीला मान देऊन मी प्रयत्न करेन" असे थातूरमातूर उत्तर देऊन क्षणीक सांत्वन करून घेण्याची तयारी [ यालाच कोपऱ्याला  गूळ लावून घेणे अशी संज्ञा  आहे ] असेल तर मग मी तसे उत्तर दिले असे समजावे.

धन्यवाद !

माझ्यापुरती ही चर्चा संपली.