चित्त, भानस, दोन पै, सन्जोप राव
तुम्हां सर्वांच्या प्रतिक्रिया आता वाचता आल्या.
मन:पूर्वक धन्यवाद.
या कथेच्या नायक शारिरिक वैगुण्यामुळे कांहीसा दुभंग व्यक्तिमत्वाचा झालेला आहे,
त्यामुळेच घरी पत्नी नसतांनाही तो विकतचे इडली, चिरोटे असें पदार्थ आणून घरी
पत्नी असल्याचा किंवा सुखी संसाराचा आव आणतो आहे,असें मला दाखवावयाचे होते.
परंतु त्या प्रयत्नांत मी कमी पडलो असें वाटते. ही कथा आणखी नेटकी व्हायला हवी होती.