क्लॉस्ट्रोफोबिया किंवा दुसऱ्या तत्सम कोणत्याही 'भयावह' व्याधित अडकलेल्यास 'अमुक करून पहा', चांगले विचार मनात आणून पाहा वगैरे सांगणे सोपे आहे. पण प्रत्यक्ष विकारग्रस्त मनुश्यास तसे करून पाहणे कितपत जमूशकते या बद्दल शंका आहे (अन्यथा तो माणूस बरा होईल की).
उलटे शक्य आहे का? म्हणजे ज्याला हा विकार नाही, त्याने तो आपल्याला आहे असा विचार करून थोडावेळ घाबरून जाणे शक्य होईल का? ते जमले तर कदाचित त्यातून बाहेर कसे यायचे हेही समजू शकेल.
मला स्वतःला कोठूनही बाहेर पडण्यास दोन किंवा अधिक रस्ते असल्यास आवडते, पण एकच रस्ता असल्यास भय मात्र वाटत नाही.