कवितारसिक आणि केवळ परस्परांशी महाजालावर गप्पाटप्पा करू पाहणारे लोक मात्र नाराजच होते. त्यांना व्यासपीठ मिळाले ते चंद्रशेखर ऊर्फ तात्या अभ्यंकरांनी, नीलकांत घुमरेच्या तांत्रिक साहाय्याने काढलेल्या मिसळपाव डॉट कॉम मुळे.
हम्म. गोळेकाका, इतका उदात्त हेतू त्यामागे होता याची कल्पना नव्हती. मला तर काही लोकांच्या फाजील लाडांना लावलेली कात्री, त्यातून दुखावले गेलेले अहंकार, याहूग्रूपवर झालेल्या चर्चा असे काहीबाही आठवत होते...