आता खरा मुद्दा हा आहे, की मराठीची ही अवस्था कशामुळे झाली? हा दोष मराठीचा आहे की मराठी वापरणाऱ्या लोकांचा?
मराठीच्या अवस्थेला काहीही झालेले नाही, मराठी भाषा अगदी धडधाकट आहे, त्यामुळे कुणाला दोष देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जी खराब अवस्था आहे ती रूढ झालेल्या तथाकथित उर्दू शब्दांना मराठी न समजणाऱ्या लोकांची आहे.
क्षते हा शब्द मराठी नाही, आणि वायू म्हणजे हवा नाही. उर्दू शब्दांमुळे मराठीत नवीन अर्थच्छटांचे शब्द आले. उर्दू शब्दांची हकालपट्टी करण्याचा सावरकरांचा प्रयत्न मराठी लोकांना पसंत पडला नाही. त्यांनी इंग्रजी शब्दांना जे प्रतिशब्द दिले तेवढेच मराठीत रूढ झाले.