भूषण,

तुम्ही म्हणता तसे

"अगदीच 'सरळ सोपे' लिहिणे आणि 'जरा विचार करायला लागणे' हे उंचींमधील भेद असतात" हे अगदीच मान्य आहे...
पण हे तुम्ही लिखाणाच्या बाबत म्हणताय, की वाचनाच्या दृष्टीने? म्हणजे, माझा मुद्दा असा आहे, की लेखकाला विचार करावा लागत असेल तर तो खुशाल लागू दे... पण वाचकाला, 'किमान पहिल्या वाचनात' तरी डोळे फिरवायची वेळ येऊ नये.

'समोर दिसणाऱ्या अर्थापेक्षा न दिसणारा अर्थ महत्त्वाचा' हे ही मान्य. पण तो 'न दिसणारा अर्थ' कधी जाणवतो? तर ती कविता पुन्हा पुन्हा वाचली तर, म्हणजे, किमान पहिल्यांदा वाचल्यावर, ती पुन्हा वाचावीशी वाटली पाहिजे. पहिल्याच वाचनात 'अगम्य' हीच प्रतिक्रिया वाचकाच्या मनात आली, तर तो पुन्हा ती कविता/गझल वाचायचे धाडसच करणार नाही... आता हा जर वाचकाच्या उंचीतला फरक असेल, तर मग बोलणेच खुंटले...

(उंच नसलेला) चैतन्य.