अजय,
वेगळीच गजल! छान वाटली.
खेळ हा दश अंगुल्यांचा खेळवावा? * ( खेळावा? )
प्रार्थनेला मंदिरी आलीच नाही;
हात मग कोणाकडे मी पसरवावा? ( कोणापुढे? ) - व्वा ! सुंदर शेर!
हा नियम अंती तुझ्यासंगेच शिकलो, ( तुझ्याकडुनीच? कडुनीचा अर्थ थोडा भिन्न आहे म्हणा! )
'हात हाती घेतल्यावर सोडवावा'..!
सोडले जेथे मला तू 'जीर्ण' म्हणुनी.. ( सोडलेस ) ( सोडले होतेस जेथे जीर्ण म्हणुनी ? )
त्याच रस्त्यावर तुझा पत्ता मिळावा? - वा वा! छान!
भेदले माझ्या मनाचे सात पडदे
ओळखीचा एकही ना सापडावा? - समजला नाही.
नाव माझे 'अजय' आहे एक डगला;
आतला माणूस कोणी ओळखावा..! ( अर्धविरामाची जागा बदलली काय? ) ( नाव माझे अजय आहे; एक डगला... )
दोन तीन शेर आवडले. अभिनंदन!