टॅलीनामा ! येथे हे वाचायला मिळाले:
संध्याकाळी पाच वाजता कॅन्टीन मध्ये बसुन चहाचे घोट घेत असताना मला आता पुढे काय याची काळजी पडली होती. मित्राला मी हेच सांगत होतो की काय साली आडवेळेची गाडी आहे, पहाटे ३.३० वाजता ही काय एक्सप्रेस सोडायची वेळ झाली का ? इतका वेळ मुंबई सेंट्रलच्या परीसरात सामान सांभाळत काढावा लागणार होता. एवढ्यात एक प्रसन्न व्यक्तीमत्वाचा माणूस आम्हाला सामोरा आला. अत्यंत अदबीने तो बोलला “माफ़ करना, आपकी बाते मुझे सुनाई दे रही थी. इस नाचीज को विवेक शर्मा कहते है, आप मेरे घर तशरीफ़ लिजीये, मेरा घर स्टेशन के पास ही है. आप मेरे घर पधारे, भोजन के बाद, कुछ गपशप करेंगे , ...