जितेन, आपला प्रतिसाद खऱ्या अर्थाने सकारात्मक आहे! धन्यवाद.

ॐकार जोशींचे ऋण विसरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांना पुरेसा न्याय मिळाला नाही असे मात्र वाटायला जागा आहे.
त्याखातर मी दिलगीर आहे.

तुम्ही घातलेली भर मोलाची आहे. तुम्हाला आणखीही काही भर घालावीशी वाटेल तर अवश्य सांगा.

माझा सर्वज्ञ असल्याचा दावा नाही. मात्र सध्यातरी कुठल्याही स्वरूपात इतिहास उपलब्ध नाही. तो भविष्यात तरी उपलब्ध व्हावा म्हणून टाकलेले ते एक पाऊल आहे. तसा स्पष्ट उल्लेख सुरूवातीस केलेला आहे.

लाभ मिळालेल्यांनी मुक्तस्त्रोतप्रणालीचे ऋण नक्कीच चुकवावे. मी १००% सहमत आहे.