एका संकेतस्थळावर हे लेखन ठेवण्याऐवजी स्वतंत्र ठेवावे. म्हणजे त्याला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त होईल.
शिवाय द्वारकानाथ कलंत्री, नीलकांत धुमारे, श्री मधुकर गोगटे, अशा अनेकांचा ह्या क्षेत्रत्त मोलाचा अनुभव आहे.
तुम्ही सर्वांनी मिळून एखादे नवे संकेतस्थल सुरू करून तेथे ही सगळी माहिती ठेवावी. तुमच्यासारखे अनेक उत्साही लोक तुम्हाला मदत करायला पुढे येतील, असा मला विश्वास वाटतो. माझ्याकडूनही काही मदत झाली तर मी करीनच. हल्ली मराठी संकेतस्थळ चटकन सुरू करणे सहज शक्य झालेले आहे, असे नव्यानव्या निघणाअऱ्या ब्लॉग्ज आणि संकेतस्थळांवरून वाटते. त्या सर्वांना एकत्र आणून एखाद्या फ्लॅगशिप प्रमाणे म्हणा किंवा एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे हे संकेतस्थळ नावारूपाला येईल असे वाटते. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून आता मराठी तरूणवर्ग संगणकक्षेत्रात येत आहे आणि जगभर आपल्या संकृतीचा ठसा उमटवत आहे. तुम्ही असा काही पुढाकार घेतला तर शेकडोजण त्याला हातभार लावायला पुढे येतील अशी मला मनोमन खात्री वाटते.
तुमच्या कार्याला माझ्या शुभेच्छा.