एक मनात आले ते लिहितो.

तुमची वृत्तावर आणि सोप्या शब्दांवर कमांड आहे हे निर्विवाद आहे.  तुमच्या ह्या पद्यकथा मनाची पकड घेतात त्यात दोन गोष्टी आहेत एक तर वृत्त आणि सोपे शब्द आणि मनाला भेदून जाणारी कथा.

परंतु जर तुम्ही सातत्याने अशा पद्यकथा सादर करत गेलात तर कथेतल्या प्रभावा बद्दल अपेक्षा वाढत जाणार (कारण वृत्ताबाबात खात्री आहेच. ) ही वाढती वेधकतेची डिमांड पुरवणे कठीण आहे.

तेव्हा माझा सल्ला असा.

तुम्ही तुम्हाला ज्या कथा सांगायचया आहेत त्या तयार ठेवा. पण सादर करताना मध्ये मध्ये अनेक गझला / कविता इत्यादी सादर करा.  (ते तुम्हाला कठीण नाही, ह्याची मला खात्री आहे. ) ह्या कथा अंतराअंतराने, थोड्या विस्म्रुतीत गेल्यावर सादर करत राहा. त्याने त्यांचा प्रभाव टिकून राहील.

शुभेच्छा.