त्यापैकी शुद्ध मराठी ही एक पुणेरी वोली आहे असे मानण्यात येते.

लंडन शहराच्या दक्षिण भागात काही शिक्षणसंस्था आहेत. त्यांच्या परिसरातच जी इंग्रजी बोली बोलली जाते, तिला क्वीन्ज़्‌ इंग्लिश असे म्हटले जाते आणि त्या बोलीतील उच्चारांना रिसीव्हड प्रनन्‌सिएशन्ज़्‌. ह्याच भाषेतील शब्द प्रमाण समजून तशाच उच्चारांसहित ऑक्सफर्ड कोशात दिले असतात.

अहमदाबादच्या एका तटबंदीच्या आत नागर ब्राह्मणांची वस्ती आहे. ते ब्राह्मण जी गुजराथी भाषा बोलतात तिला शुद्ध गुजराथी समजले जाते.

कलकत्त्याच्या एका विशिष्ट भागात बोलल्या जाणाऱ्या भद्र लोकांच्या बोलीला भद्र बंगाली समजले जाते, असे ऐकून आहे.