तुझ्या-माझ्यात हा जो थंड शब्दासारखा आहे...
अबोला पार वितळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!

दुराव्यातील या जखमा बऱ्या होतील की नाही?
पुन्हा हा प्रश्न चिघळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!

कशासाठी उगा साध्यासुध्या मौनात या माझ्या...
- नको तो अर्थ मिसळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!    
... प्रदीपजी, हे फारच आवडले- एकूणच सुरेख !