माझा सर्वात पहिला आक्षेप हा आहे की स्वतः वर्षात जेमतेम एखादी गजल झळकावणारे एखाद्या दिग्गज समीक्षकाच्या थाटात जोरदार मतप्रदर्शन करतात हे नवोदीत लोकांसाठी अत्यंत दिशाभूल करणारे आहे. मैदानात यावे, आपले उत्पादन प्रदर्शनास ठेवावे व नंतर काय ते बोलावे. तसेच, कवींची समीक्षा कवींनीच करावी, अभ्यासकांनी एकमेकात चर्चा केलेली बरी पडते.

रोज एक गझल किंवा कवितेचा रतीब घालणारे कवी हे कवी व वर्षभरात एखादी गजल झळकावणारे हे कवी नाहीत हे विधान अपमानजनक आहे! 'कमीत कमी १२ कविता लिहल्या असतील तेच समीक्षेसाठी पात्र अन्यथा अर्ज करू नयेत' असली विधाने व 'मी खूप लिहतो' म्हणून मी मोठा कवी' असली गर्विष्ठ (व हास्यास्पद)विधाने करू नयेत. मला एका वाचलेल्या वाक्याची आठवण होते.

"सूर्यावर थुंकणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की त्यांची थुंकी सूर्यापर्यंत पोचत नाहीच पण परत येऊन थुंकणाऱ्यांचाच चेहरा खराब करते"

रोज सकाळ संध्याकाळ रतीब घालणाऱ्यांनी आपले दूध अनेक वेळा पातळ, पाणी घातलेले वा नासलेले असते याचेही भान ठेवावे.

पुन्हा उद्विग्न!
जयन्ता५२