प्रथमेश, प्रतिसादाखातर धन्यवाद.
मात्र काय प्रतिसाद द्यावा? आणि आपली आवड कुठे आणि कशी व्यक्त करावी याबाबत आपले मनात गोंधळ दिसतो.
इतिहास हा भविष्याला पर्याय ठरू शकत नाही. दोन्हीही स्वतंत्ररीत्याच अभ्यासावे लागतात.
महाजालावरील मराठीच्या भवितव्याबाबत भाष्य करण्याचा वरील लेखात कोणताच मानस नव्हता.
आपल्याला याबाबतच्या भाकीतात रुची असल्याची माहिती आपल्या प्रतिसादातून मिळाली.
तांत्रिक वैज्ञानिक बाबतीत इतिहास फारसा काही उपयोगी ठरत नाही हे वाक्य चुकीचे आहे.
भाषा कशी हवी? >> लेखन हे भाषिक व्यवहारांचे अंकन असते म्हणून लिखित भाषा 'प्रमाण' हवी.
संकेतस्थळ कसे हवे? >> उत्तम प्रशासित, होता होईल तोवर लोकशाही संचालित, त्वरित प्रतिसादानुकूल, तंत्रज्ञानास धार्जिणे आणि तंत्रशास्त्रनिपूण व्यक्तीसंचालित असावे, सर्व लोकांस लेखनाकरता मुक्त असावे.
कसे असेल? >> हे अभ्यासाविना सांगणे अवघड आहे. मात्र हे उत्तर तुमच्याप्रमाणेच मलाही आवडेल.