माफ करा गोविलकर साहेब, पण मी या विचाराशी सहमत नाही.  हा लेख चांगला आहे, महत्त्वाचा आहे यात शंका नाही पण नवीन संकेतस्थळ काढून ते नावारूपाला आणणे सोपे नाही. आज संकेतस्थळ काढणे सोपे असले तरी ते चालवणे सोपे नाही. चालवणे म्हणजे नियमित लिहणारे सदस्य वाढवून नावारूपाला आणणे. किती संकेतस्थळे ३-४ वर्षांपेक्षा जास्त काळ टिकली आहेत? किती ब्लॉग (यात पुरस्कारप्राप्त ब्लॉग आले) १ वर्षांनंतरही नियमीत लिहिले जात आहेत? वर लेखात शासनाने दिलेल्या पुरस्काराबद्दल लिहिले आहे. पण नंतर त्याचे काय झाले? आता तो पुरस्कार देणे का थांबले? का मराठी विश्वात एकदाच पुरस्कार देण्याइतकी संकेतस्थळे आहेत असे शासनाला वाटते.

तुम्ही असा काही पुढाकार घेतला तर शेकडोजण त्याला हातभार लावायला पुढे येतील अशी मला मनोमन खात्री वाटते.

असे काही होत नसते. नुसते सहमत म्हणायला १०० प्रतिक्रिया येतील सुद्धा. पण या लेखमालेत लिहिलेल्या कुठल्याही  संकेतस्थळांच्या चालकाना विचारून पहा. खरोखर मदत करणारे किती असतात आणि ते किती दिवस टिकतात? 

शिवाय द्वारकानाथ कलंत्री, नीलकांत धुमारे,  श्री मधुकर गोगटे,  अशा अनेकांचा ह्या क्षेत्रत्त मोलाचा अनुभव आहे.

बाकीच्यांची नावे माहिती आहे पण माफ करा मला द्वारकानाथ कलंत्री यांनी या विषयात काही केले आहे हे माहिती नाही.  आणि त्यांनी केलेले कार्य सद्ध्या कुठे आहे? त्याचे काय झाले?