"राधा कैसे ना जले" या गाण्यात मागे तरणे ताठे हट्टेकट्टे तरुण नाचताना दाखवले आहेत.
ते क्रिकेट खेळायला का येत नाहीत?
कारण फक्त चंपानेरच्या लोकांनीच खेळले पाहिजे असा काही नियम नाहीये, तसे असते तर देवासिंग सोधी खेळु शकला नसता.
भुवन जर का स्वतःच्या गावातल्या लोकांचे मत परिवर्तन करु शकतो तर इतर गावातल्या लोकांचेही करु शकतो.
इतर गावांतले लोक भुवन ला ठोक द्यायला येतात मग तेच आपली खुमखुमी जिरवण्यासाठी भुवनच्या खांद्याला खांदा लावुन क्रिकेट का नाही खेळत?