गंभीरपणे या विषयावर विचार केला तर तुम्ही विचारलेल्या सुखी कुटुंब होण्यासाठी प्रेमविवाह आवश्यक आहे काय? या प्रश्नाचे उत्तर ''नाही'' असे मला तरी वाटते . कारण जिथे प्रेमविवाह झालेले आहेत तिथे सामंजस्याचा अभाव आढळतो. प्रेमविवाहात नेहमीच ''मी कमीपणा का घ्यायचा?'' अशी भावना असते (याला अपवाद असू शकतात) . मग भलेही लग्न होण्यापूर्वी त्या दोघांनी कितीही समर्पणाची तयारी दाखवलेली असो, नंतर संसारात या गोष्टी विसरुन जातात बिचारे! पण तोच जर नियोजित विवाह असेल तर... तडजोडीची तयारी असते, तोच तर एकमेंकावरील प्रेमाचा खरा दाखला.

  नवरा-बायकोतील सौंदर्य, आर्थिक बाजू, शिक्षण  या बाबी नक्कीच संसारातील सुख-समाधानाशी निगडीत आहेत. महत्त्वाचे म्हणजे त्यावर मानसिक स्वास्थ अवलंबून आहे. नवरा-बायकोतील सौंदर्याने दोघांची मने जवळ येतात. आर्थिक बाजू भक्कम असेल तर कठीण प्रसंगाचे भय मनात रहात नाही, कशीही परिस्थिती आल्यास समर्थपणे तोंड देण्याची तयारी असते.  शिक्षणाने माणूस सुसंस्कृत होतो, आणि सुसंस्कृतपणाचा सुखी संसारात सिंहाचा वाटा आहे.

  अर्थात् असे मला वाटते, अजून ही बरेच लिहावेसे वाटते,पण तुम्ही सुद्धा सांगा ना, तुम्हांला काय वाटते ते???