मुक्तांगण येथे हे वाचायला मिळाले:

पाठोपाठ दोन सलग आठवडयांनी कंटाळ्याला ऊत आणला की मी समोरच्या रस्त्याचं टोक पकडून सुसाट चालत सुटते. घराच्या खिडकीतून डोकावून पाहिल्यावर रेंगाळलेला रस्ता दिसतो.....रस्त्यावर उभं राहिलं की डाव्या हाताला लागूनच एक मोठ्ठंच्या मोठ्ठं खाजण पसरलंय....वेडया -वाकडया, खुरटया कशाही वाढलेल्या खारफुटी आणि पलीकडे उंच बिल्डिंग्झची एक आडवी रांग....

मागे मान वळवून पहावी तर कंपाउंड वॉलच्या आत गच्च गर्दीत, सुपारीच्या झावळ्यांची मिट्ट दाटीवाटी आणि त्यात हरवून गेलेली खिडकी...... त्यातल्या त्यात लक्षात राहतात त्या पोफळीच्या झाडांवरच्या पांढुरक्या ...
पुढे वाचा. : सोसायटी