आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:
काही दिवसांपूर्वी माझ्या मित्राला एका फ्रेंच फिल्मची डीव्ही़डी मिळाली. फिल्म दशकापूर्वीचीच म्हणजे फार जुनी नव्हती, पण होती ब्लॅक अँड व्हाईट. दुर्दैवाने ल हाईन नावाच्या या फिल्मला सबटायटल नव्हती. मात्र त्यातील चित्रणशैली आणि दृश्यसंकल्पनाच इतक्या प्रभावी आणि लक्षात राहण्यासारख्या होत्या की माझ्या मित्राने एक अक्षर न कळताही ती संपूर्ण पाहिली. मलाही त्यातले काही तुकडे दाखविले आणि पूर्ण चित्रपटाची पुरेपूर तारीफही केली. आम्ही तेव्हाच ठरवलं, की या चित्रपटाचा शोध घ्यायचा आणि सबटायटल्स असणारी कॉपी मिळवायचा प्रयत्न करायचा.