सिगारेट मुळे मनुष्याच्या शरिराचे नुकसान होऊ शकते असे वैद्यकीय शास्त्र सांगते. सिगारेटचा धूर, त्याचा शरीरावर होणारा परिणाम, किंवा त्याधुरातील घटकांचा होणारा परिणाम, याचा आधिच कधीतरी अभ्यास झालेला असतो. त्यावरून काही निष्कर्श काढलेले असतात. त्या निष्कर्शांना बळ देण्याचे काम ही सर्वेक्षणे करत असतात. अमुक एक गोष्टीचा तमुक परिणाम होऊ शकतो या गृहितकाला काहीतरी विज्ञानमान्य आधार असतो, ते गृहीतक संख्याशास्त्राच्या मदतीने असे दृढ केलेले असते.

ग्रहगतींचा मनुश्याच्या आयुश्यावर होणाऱ्या परिणामाल तसा विज्ञानाचा (म्हणजे जड सृष्टीचा अभ्यास करणाऱ्या ज्ञानशाखेचा) कोणताही आधार नसतो. म्हणूनच आपण ज्याला विज्ञान म्हणतो, त्यात भविष्य वर्तवण्याचे 'शास्त्र' बसत नाही. ग्रहगतींचा आपल्या आयुश्यावर, तोही जन्मवेळेनुसार कसा काय परिणाम होतो, हे कुणी शास्त्रीबुवा आजच्या विज्ञानाच्या परिभाषेत सांगू शकले, पूर्ण सिद्ध न करत जरी केवळ अंगुलीनिर्देश करू शकले तरी भविष्यकथन हे विज्ञान आहे असे म्हणता येईल. तो पर्यंत नाही.

तोपर्यंत हे निदान संख्याशास्त्राच्या कसोटीवर तरी चमकू दे. भविश्यकथनातील अक्कल नसलेला, परंतु परिस्थिती चा अंदाज पाहून आडाखे बांधू शकणारा एका बाजूला, आणि ग्रहगणिताद्वारे, किंवा रेशा पाहून आडखे बांधू शकणारा, यांच्यापैकी ग्रहगणितीचे आडाखे अधिक बरोबर आले, आणि ते जर ठराविक प्रमाणापेक्षा (उदा ७०%) अधिक असतील, तर संख्याशास्त्रानुसार ग्रहानुसार भविष्य सांगण्याच्या पद्धतीत दम आहे असे म्हणता येईल.