वरील 'वैयक्तिक' मताचा आदर राखून असहमती दर्शवतो व काही प्रभावी मुक्तछंद/छंदमुक्त काव्याचे दाखले देतो -

१. सांगा कसं जगायचं - मंगेश पाडगावकर
२. सलाम - मंगेश पाडगावकर
३. शांतता - शंकर वैद्य - तुम्ही मागे एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे ही 'निसर्गकविता' समजा हवे तर; पण टिकून आहे आणि कविताच आहे!
४. लिलीची फुले - पु. शि. रेगे
५. काय पण बेटे ऊन आहे - सुरेश भट
६. अखेर कमाई - कुसुमाग्रज
७. प्राक्तनाचे संदर्भ - द. बा. धामणस्कर

अशी कितीतरी उदाहरणे देता येतील जी तुमच्या संकल्पनेनुसार/व्याख्येनुसार काव्य ठरणार नाहीत पण काव्येच आहेत. असो.

वरील कित्येक उदाहरणांमध्ये ठेका, लय काही ठिकाणी आहे काही ठिकाणी नाही. वृत्त बित्त तर अजिबात नाही. तुमचा मूळ आक्षेप - गद्याच्या ओळी तोडून सुट्या करून पद्य म्हणून लिहिणे वगैरे - त्याही कवितांना लावता येईल. पण तुमचेच वर म्हटलेले काव्याचे निकष त्या मुक्तछंद/छंदमुक्त कवितांना लागू पडतातच. त्यामुळे छंदमुक्त व मुक्तछंद यांच्ञातला फरक समजावून घ्या आणि त्या काव्यप्रकारांविषयी स्वच्छ, मोकळी दृष्टी बाळगा, इतकाच प्रेमळ सल्ला देतो.

फार दूर जायची गरज नाही. याच संकेतस्थळावरील बैरागी, जयंता५२, फिनिक्स वगैरेंचे छंदमुक्त/मुक्तछंद काव्य वाचा.

(विषयांतर व/वा व्यक्तिगत संदर्भ / रोख वाटलेला मजकूर वगळला : प्रशासक)