आपल्या मते गझल म्हणजे काय व प्रस्तुत कविता गझल का नि कशी नाही, हे स्पष्ट सप्रमाण समजले तर बरे होईल.

गझल ही व्याख्या आणि साहित्यप्रकार व्यक्तिसापेक्ष नसावा, असे वाटते. आदरणीय भटसाहेबांचे हे वाक्य या संदर्भात हटकून आठवतेच - बदलत्या काळाच्या संदर्भानुसार गझलेमधील शेरांचे संदर्भ बदलू शकतात. पण गझल म्हणजे काय हे कवीच्या सोयीनुसार ठरत नसते- आणि ते समीक्षकांच्या सोयीनुसार नव्हेच नव्हे!

म्हणजे तुम्ही कविता क्ष ला गझल म्हटले किंवा म्हटले नाही यावरून ती गझल आहे किंवा नाही असे काही नसते. रदीफ, काफिये इ. तांत्रिक अंगे जरा बाजूला ठेवून गझल व कविता यांमधील सूक्ष्म फरक लक्षात घेतला तरी मी या कवितेला गझलच म्हणू शकतो.

बाकी ४००० कवी वगैरे सांख्यिकी पुलस्ती म्हणतात तशी निरर्थक आणि अनाकलनीय. या ४००० कवींमध्ये आपला नंबर कितवा हे प्रत्येकाने आपापले तपासून पाहणे इष्ट!

एकंदर कविता व गझल यांच्याबाबत नि मुख्यत्त्वे त्यांच्या तत्त्वज्ञानाबद्दल गेले काही दिवस येथे जे खोडसाळ मतप्रदर्शन चालू आहे, त्याचे सखेद आश्चर्य वाटते. असो.

१. गझलेच्या बाराखडीतून साभार