पंतकाव्य, नवकाव्य, गझल, मुक्तछंद... आणि एकंदरच
"कविता कशाला म्हणावे" यावर सध्या जी/ज्याचर्चा चालू आहे/आहेत त्या
चर्चेने या "कविते" वर २ मिनिटे जरूर थांबून विचार करावा असं सुचवावसं
वाटतं.
आपले विचार मल नेहमीच संतुलित वाटतात. आपले वरील मत व ते मांडण्याची हातोटीही निश्चीतच संतुलीत आहे. पण मला हे मत पटले नाही.
जशा मी याच संकेतस्थळावर सादर केलेल्या पाच/सहा 'दीर्घ-वृत्तबद्ध' रचना या माझ्यामते 'कविता' नसून 'कथा' आहेत तसाच वरील 'उताराही' एक कथा आहे. त्यात काव्य नाही. 'पद्य' तर नाहीच आहे हे आपणही म्हंटलेले आहेतच. यात कुठेही कवीला दुखावण्याचा उद्देश नाही. तशी शंका जरी आली तरी माझी ही मते तात्काळ मागे घ्यायला तयार आहे.
पद्य = जे वाचताना / ऐकताना 'शक्यतो' 'एकच ठेका व लय' धरता येते व ठेका व लय धरता येतेच. काही काही गीते असतात ( विशेषतः हिंदी चित्रपटात, ज्यात अचानक पट्टी / लय / ठेका / चाल काहीतरी बदलू शकते. लगेच आठवणारे उदाहरण म्हणजे 'बाँबे' या चित्रपटातील 'हम्मा हम्मा' हे गीत. या गीताच्या शेवटी पट्टीच बदलली आहे व लय वाढवली आहे. तरीही ते एक अपवादात्मक पद्य ठरावे. )
काव्य = एकाचवेळी रचनेमध्ये खालील गोष्टी 'कमी-अधिक' प्रमाणात असणे व त्या तशा असाव्यात अशी कवीची निदान इच्छा / क्षमता आहे असा विश्वास वाटण्याइतपत त्यांचे प्रमाण असणे!
१. कल्पनाविलास - नीळकंठ व्हा पुन्हा शंकरा मासे तडफडती काठावर - कवी पुलस्ती
२. सर्वसमावेशकता ( ऍप्लिकॅबिलिटी) - प्रगतीच्या व्याख्येमध्ये म्हादूची टपरी नाही - कवी पुलस्ती
३. रुपके / प्रतिमा / उपमा - धूत गेले नेहमी मग डाग हा आला कसा? - कवी पुलस्ती
सुरवंट रेंगणारे विणतीच कोष त्यांचा - कवी पुलस्ती
४. नवनिर्मीती / नावीन्य ( त्याच गोष्टीकडे पाहण्यातील ) - कसली खोगिरभरती करता हो देवा? घट्ट कुणाची मांडच जगण्यावर नाही - कवी पुलस्ती
५. उपयुक्तता ( सर्वांसाठी ) - ( उपयुक्तता म्हणजे ती ओळ आठवून माणसाला रिलीफ मिळाला पाहिजे किंवा स्फुर्ती आली पाहिजे. )
ऊदाहरण म्हणजे आपली 'जटायू' ही अख्खी गजल, फक्त त्यातील 'जटायू' अन 'कविता' हे शेर सोडून!
आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल की गजलेत किंवा कवितेत नुसतेच 'तू तू' , 'मी मी' करणाऱ्यांना महान कवी समजले जाते. ( हा वैयक्तिक रोख असलेला वगैरे भाग नाही, कृपया वगळू नये, विषयाला धरून आहे. )
कुठल्याही कवितेत वरील घटक हे प्रकर्षाने जाणवले पाहिजेत असे माझे ठाम मत आहे.
माझ्यामते सदर रचना ही कविता तर नाहीच आहे पण तो जो कुणी माणूस आहे त्याचे घर कशाने उद्ध्वस्त झाले आहे तेच समजत नाहीये. - हे मत कवीला उद्देशून नसून एका प्रकाशित रचनेबाबत एका रसिकाचे मत्त आहे.