जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा लावून धरलेला आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात जे हिंदी भाषिकांचे जे आक्रमण होत आहे, त्याच्या विरोधात त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे.काही वर्षांपूर्वी शिवसेनेने मराठीचाच मुद्दा घेत मुंबई व महाराष्ट्रात आपले बस्तान बसवले होते. मात्र गेल्या काही वर्षात शिवसेनेने मराठीचा मुद्दा सोडून दिला आणि तोच मुद्दा राज ठाकरे यांनी उचलला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आदी ठिकाणी उमेदवार उभे केले होते. मनसेचा कोणीही उमेदवार ...