प्रेमविवाह हा कधीच आवश्यक म्हणुन केला जात नाही. प्रेम जमलं तर एकमेकांनी विचाराअंती घेतलेला हा निर्णय असतो. विवाह कश्याही प्रकारे जमला असो त्यात मुख्यतः दोघांचे विचार, समज किती जुळतात आणि तडजोड किती चांगल्या प्रकारे (स्वतः त्रास करुन न घेता आणि दुसर्‍याला त्रास न देता) करता येते यावर पुढचं सगळं अवलम्बून असतं. जेन्व्हा तुझ्या-माझ्याशिवाय दुसरा कोणीतरी वादाचा मुद्दा होऊ शकतो तेंव्हाच नवराबायकोने सावध व्हायला पाहिजे की आपलं कुठेतरी काहीतरी चुकतयं . अपेक्षा आपल्या जोडीदाराकडून ठेवल्या आणि त्या विषयी वाद झाला तर ठीक आहे पण तुझ्या बहिणीने अस केलं किंवा केलं नाही, तुझे बाबा फ़ारच कंजूष/पक्के आहेत हे कमेंट्स सुरू झाले की नकळत तुम्ही एकमेकांना त्यानी न केलेल्या चुकांसाठी दुखावताय हे लगेच लक्षात घ्या. हे मी नवविवाहितांसाठी लिहितेय असे नाही. ही फ़ार कॉमन गोष्ट आहे (पिढ्यानपिढ्या चालत आलेली) कोणी आपणहून आपल्या जोडीदाराला दुखवण्यासाठी असे करत नाही पण एकदा ते सुरु झाले की त्याची पुनरावृत्ती अगदी सहज होते आणि मग ती गोष्ट हाताबाहेर जाते . आजकालच्या काळात शक्य असेल तेव्हढा प्रेमविवाह करणच बरं अस माझं प्रामाणिक मत आहे निदान परिचय-विवाह तरी! कारण अजुनही आपल्याकडे अरँज विवाहाच्या प्रोसेस मधे काहीही बदल नाही (थोडासा आहे पण नगण्य) हे मी माझ्या स्वतःच्या नाही पण माझ्या मावसबहिणीच्या अनुभवावरून सांगतेय. बरचं काही लिहिता येईल या विषयावर ...