क्रिकेट मधल्या चुका
ओव्हर ही जुन्या काळी दहा आणि मग नंतर आठ चेंडुंची असे. सहा चेंडुंची ती विसाव्या शतकात सुरु झाली.
छक्के आणि चौक्याचे पण तसेच आहे...तेव्हा चेंडु जितका लांब जाई तितका जाऊन देत. क्षेत्ररक्षकाला तो जितका लांब जाईल तिथुन आणावा लागे..."बाउंड्री" ची कल्पना नंतर वापरण्यात येऊ लागली. यां बदलांचा निश्चित कालखंड आठवत नाही, पण बहुदा तो १८९३ नंतरच असावा.

गोलंदाजाने चेंडु न टाकता धावपटुला (नॉन स्ट्रायकर) बाद करणे ही कल्पना विनू मंकड ने प्रथम वापरली, म्हणून त्या पद्धतीला "मॅनकडेड" (मंकड चे इंग्रजी क्रियापद बनवून त्याचा भूतकाळ) असे म्हणतात.

सर्व शक्य प्रकारांनी फलंदाज बाद होण्याचा हा एकमेव खेळ असावा.
आधुनिक क्रिकेट मधल्या नियमांप्रमाणे १०० वर्षांपूर्वीचे क्रिकेट दाखवले आहे!

लगानचा दिग्दर्शक डुलक्या पण नाही, चांगला ढाराढुर झोपला होता असेच वाटते!