एकाच/समान गोष्टीबाबत तुमच्या व्याख्या नि माझ्या व्याख्या नि तिसऱ्या कुणाची व्याख्या असले काही नसते. व्याख्या ही मान्यताप्राप्त, सिद्धता असलेली संज्ञा आहे. आधी एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे मुक्तछंदासारखा मान्यताप्राप्त साहित्यप्रकार केवळ 'तुमच्या व्याख्येत' बसत नसल्याने खारीज होत नसतो. तुम्हाला तो आवडत नाही, तुम्ही ते मानत नाही हे मान्य, समजण्याजोगे. पण म्हणून ते काव्यच/कविताच नाही, हे अनाकलनीय. असो.
कोणताही छंद पाळत नसलेले, छंदाचे बंधन नसलेले काव्य म्हणजे मुक्तछंद ही इतकीच व्याख्या पुरेशी, पटेलशी आहे(विकिपिडियावर माझा विश्वास आहे) वास्तविक तुमच्या काव्याबद्दलच्या संकल्पना (त्यांना मी व्याख्या निश्चितच म्हणणार नाही; कारण त्या 'तुमच्या' संकल्पना आहेत व मी प्रथमपासूनच सरसकटीकरणाच्या विरोधात आहे) मुक्तछंदाला लागू पडतातच! तुम्ही वरच्या प्रतिसादात म्हटल्यानुसार पद्याचे निकषही (गेयता सोडून) लागू होतात मुक्तछंदाला. त्यामुळे मुक्तछंद हे काव्य आहेच, हे 'तुमच्याच व्याख्येनुसार' सिद्ध होते. गेय किंवा गायलेल्या कित्येक उत्तम मुक्तछंदांची उदाहरणे देता येतील (उदा. कवी - गुलजार, संगीत - आर डी बर्मन).
पानी पानी रे
खारे पानी रे
नैनों में भर जाए
नींदे खाली कर जाए
हे काय आहे? काव्य/पद्य आहे की नाही? गाणे/गेय आहे की नाही? विचार/निर्णय तुमच्यावरच सोपवतो. तुमचेच निकष लावून तपासावेत. तुमच्याकडे असलेल्या सीडीतील गायकाची तारांबळ उडाली असणे वगैरे दुर्दैव समजू; पण पुन्हा सरसकटीकरण चुकीचेच, अपवादांना स्वीकृती हवी.त्यातूनही गुलजारसारखे, बर्मनसारखे अपवाद असतील तर का नाही?
मी दिलेल्या उदाहरणांनाही 'तुमचे' काव्य असण्याबद्दलचे निकष लागू पडतातच असे माझे ठाम मत आहे. कोणाला त्या कविता 'कविता' वाटत नसतील, तर 'तुमच्या' पद्य व काव्य याप्रमाणे कविता हा एक आमूलाग्र भिन्न साहित्यप्रकार निर्माण केला जाण्यास प्रत्यवाय नाही. आणि मी ज्यांची उदाहरणे दिली ते कविवर्य कितीही श्रेष्ठ असले तरी त्यांच्या मुक्तछंद कविता या कविताच नाहीत या तुमच्या विधानानंतर तर मला प्रस्तुत विषयावर काहीच बोलायचे नाही.
पुरेसे म्हणणे मांडून झाल्याची खात्री झाल्याने व त्यावरील प्रतिवादाचे अपेक्षित थिटेपण लक्षात घेऊन माझ्याकडून तरी हा वाद येथेच संपवीत आहे.
धन्यवाद!
(व्यक्तिगत रोख वाटलेला काही भाग वगळला : प्रशासक)