तुमचा "प्रवास" बघितला. वाचायला वेळ लागेल, पण शितावरून ... चांगलाच वाटला.
संस्कार म्हणजे एक किंवा दोन गोष्टी नाही. आता प्रसुतीपुर्व संस्कारांना विज्ञानानेही मान्यता दिली आहे. केवळ आपण चांगलं वागून चालेल असं वाटत नाही, कारण चांगल्या आईबापांची मुलं बिघडलेली उदाहरणं कमी नाहीत. तसंच चिखलातलं कमळही कमी नाहीत.
मला तरी वाटतं की बाहेरच्या वातावरणात स्वतःच्या विचारांना भरकटू न देता शाश्वत विचारांवर श्रद्धा ठेवणे आणि त्यानुसार वागणे म्हणजे संस्कार.
संस्कार करता येईल, पण त्या व्यक्तीला ते पटून ते विचार टिकवता आले पाहिजे, आणि बदलत्या परिस्थितीमध्ये त्या विचारांना त्या मुशीत घडवता (मोल्ड करता) आलं पाहिजे असं मला वाटतं.
यावर अधिक चर्चा होईल तसे इतरही मुद्दे येतील. लेखाबद्दल अभिनंदन.