संतोष कागवटे: 'जातिवाचक विशेषणे' हा सर्वसामान्यांच्या (पॉलिटिकली इनकरेक्ट) भाषेचा एक भाग असतो असे मला वाटते. मी तरी त्या अंगाने ती वापरली आहेत.
नंदन: सविस्तर लेखाची मीही वाट पाहतो आहे!
दोन पै: शिखरपरिषदेत काय झाले याचे उत्तर - मित्रवर्य इथला व्यवसाय गुंडाळून गेले दशकभर संयुक्त संस्थानांच्या पूर्व किनाऱ्यावर पाय रोवून नोकरी करीत आहेत.
मराठीप्रेमी: 'निशाणी डावा अंगठा' हे पुस्तक आहे पटावर, पण अजून हातात घेतलेले नाही.
सन्जोप राव: विल्स किंग मिळणे अवघड व्हायला लागल्यावर मी क्लासिक माईल्डवर गेलो. ही गोष्ट दशकापूर्वीची. सध्याची परिस्थिती माहीत नाही.
सुधीर कांदळकर: कटवडा मिळतो की नाही हे एवढ्यात तपासले नाही. लौकरच एक चक्कर मारीन आणि सांगेन.