टाळ्या हजार पडुनी कशास पाणावलेत डोळे?
अंतर तुझ्या नि माझ्यातले म्हणावे तसे न होते... पहिल्या व दुसऱ्या ओळीत काय संबंध आहे?
प्रसिद्ध होत असताना/ यश मिळत असताना दुःख कशाने/कशाचे झाले? तुझ्या-माझ्यातले अंतर फारसे नसल्याने माझ्या यशात आता तुलाही वाटा द्यावा लागणार आहे.

वैमानिक नाही कि कोणता पक्षी नाही
भरारी अंबरात घेण्यास कारण कधीच नव्हते
व्वा! जमलं की! (म्हणजे तुम्हाला समजले आहे तर!) पण वृत्तात असते तर आणखी मजा आली असती. अंबरात भरारी घेण्यासाठी मी कोणता वैमानिक किंवा पक्षी नाही? तरी असे का झाले? (उत्तर : लोकांच्या दृष्टीने मी सामान्य असलो तरी अंबरात भरारी घेऊ शकतो.) (विनोद : नेहमीपेक्षा जास्त चढली असेल.)

मी शिल्पकार नाही कि कोणता चित्रकार नाही
जमण्यास वेदना अंतरात कारण कधीच नव्हते

मी शिल्पकार किंवा चित्रकार नाही. (म्हणजे असा कलाकार नाही.) मग वेदना कशाने झाली? (याला कारण तूच तर नसशील? - कोणी म्हणेल असे कुठे लिहिले आहे? अशांचा मी विचार करीत नाही.)

बाकी गझलेबद्दल बोलायचे तर रदीफ नसलेली आणि फक्त स्वरकाफिया असलेली गझल करण्याचा प्रयत्न आहे.

अगम्य, अनाकलनीय, दुर्बोध इ. इ. - या प्रतिसादांबद्दल मनापासून धन्यवाद. तुम्हाला नाही समजले तरी हरकत नाही. पण या गझलेवर तुम्ही विचार केलात हे माझ्या दृष्टीने खूप झाले.

धन्यवाद!