चिरेबंदी कुठे माझी कुणाला भेदता आली?
चिरा एकेक निखळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी! व्वा!
फुलापेक्षा किती नाजूक आहे जीव हा माझा...
जरा हा भाग वगळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी! अजून काही करता आले असते.
तुझ्या-माझ्यात हा जो थंड शब्दासारखा आहे...
अबोला पार वितळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी! अजून काही करता आले असते.
दुराव्यातील या जखमा बऱ्या होतील की नाही?
पुन्हा हा प्रश्न चिघळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी! छान!
पाहा, गेलीस कोमेजून तू श्वासांमुळे माझ्या...!
कशाला गंध उधळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!! संदिग्धता. (लिहिण्यातच)
कशासाठी उगा साध्यासुध्या मौनात या माझ्या...
- नको तो अर्थ मिसळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी! हे छान.
एकंदरीत छान.