तुमचा "प्रवास" बघितला. वाचायला वेळ लागेल, पण शितावरून... चांगलाच वाटला.
प्रसाद=> धन्यवाद!!
संस्कार म्हणजे एक किंवा दोन गोष्टी नाही. आता प्रसुतीपुर्व संस्कारांना विज्ञानानेही मान्यता दिली आहे. केवळ आपण चांगलं वागून चालेल असं वाटत नाही, कारण चांगल्या आईबापांची मुलं बिघडलेली उदाहरणं कमी नाहीत. तसंच चिखलातलं कमळही कमी नाहीत.
प्रसाद=> अगदी बरोबर बोललात. मी उदाहणार्थ एक गोष्ट सांगितली.
मला तरी वाटतं की बाहेरच्या वातावरणात स्वतःच्या विचारांना भरकटू न देता शाश्वत विचारांवर श्रद्धा ठेवणे आणि त्यानुसार वागणे म्हणजे संस्कार.
प्रसाद=> आपली 'संस्कार' ची व्याख्या अगदी पटते. पण हे स्वतःचे विचार हे बाल मनातच आकार घेतात. माझ्या मते, पुढे चालून आपले अपत्य हे चांगले किंवा वाईट निघेल याचा विचार न करता आपल्या विचारातून व कृतीतून त्याला घडवण्याचा प्रयत्न करावा. तेव्हाच त्याचे स्वतःचे विचार घडत जातील.
संस्कार करता येईल, पण त्या व्यक्तीला ते पटून ते विचार टिकवता आले पाहिजे, आणि बदलत्या परिस्थितीमध्ये त्या विचारांना त्या मुशीत घडवता (मोल्ड करता) आलं पाहिजे असं मला वाटतं.
यावर अधिक चर्चा होईल तसे इतरही मुद्दे येतील. लेखाबद्दल अभिनंदन.
प्रसाद=> आपण आपले विचार नमुद केल्या बद्दल धन्यवाद!!