आपल्याकडे जेव्हा ( साधारणपणे ) रामदास स्वामी मनाचे श्लोक लिहीत बलोपासनेचा प्रचार करण्यासाठी सर्वत्र विहार करत होते तेव्हा परदेशात मार्कोनी रेडिऑचा शोध लावत होता.

रामदासस्वामींचा काळ १६०८ - १६८१. रेडिओचास शोध लावणाऱ्या मार्कोनीचा काळ १८७४ - १९३७. संत आणि पाश्चात्य शास्त्रज्ञांची तुलना सावरकरांनी पहिल्याने केली त्यात तुकाराम - रामदासस्वामींची तुलना न्यूटनबरोबर केली होती.

बाकी न्यूटन गुरूत्वाकर्षणाचे नियम लिहीत असताना आपल्याकडे रामदास बलोपासनेचा उपदेश करत विहार करत होते आणि तुकाराम अभंग लिहिण्यात मग्न होते त्यामुळे आपली प्रगती झाली नाही या युक्तिवादात मला अर्थ वाटत नाही. पाश्चात्य देशातही कोपर्निकस सूर्यकेंद्रित विश्वाचा सिद्धांत सांगत असताना सेंट  मार्टीन ल्यूथर प्रॉटेस्टंट पंथाची स्थापना करण्यात मग्न होते इतकेच नाही तर त्यांनी कोपर्निकसचा सिद्धांत अमान्यही केला होता यात कोणालाही काही आक्षेपार्ह वाटत नाही तर आपल्याला रामदास - तुकाराम आक्षेपार्ह का वाटावेत? हे दोन लोक अध्यात्मिक प्रवृतीचे असले तरी शास्त्रीय संशोधन न झाल्याचा दोष यांचा कसा? बाकी लोकांना संशोधन करू नका असे या दोघांनी सांगितले होते का?

विनायक

अवांतर - या विषयावर पूर्वीही चर्चा झाली आहे आणि तिथेही मी हेच मत दिले होते.

विनायक