जर दादोजी कोंडदेव महाराजांचे गुरु असतील तर पुस्तकात तसा उल्लेख असावा. जर ते महाराजांचे गुरु नसल्याचे सिद्ध करणारे ठोस पुरावे मिळाले तर तो उल्लेख काढून टाकावा. या गोष्टीला जातीपातीचे निकष लावू नयेत.
मेटे वगैरे लोक मूर्ख आहेत असे वाटते. निष्कारण दोन जातींमध्ये असलेली भांडणे वाढवण्याचे काम चालू आहे. इथे एक अजून सांगावेसे वाटते की बाबासाहेब पुरंदऱ्यांचेही लेखन मला संशोधन प्रकारचे वाटले नाही. शेजवलकरांचे काही लेखन वाचल्यानंतर पुरंदरे हे इतिहासकार नसून कादंबरीकार आहेत असे वाटू लागले. पुरंदऱ्यांची राजकारणी लोकांसोबत असणारी उठबस वगैरेही फारशी आनंददायी नाही. त्यामुळे पुरंदरेंना त्या समितीवरुन काढले त्याचा आनंद किंवा दुःख असे काही झाले नाही. मात्र ज्या पद्धतीने ते झाले त्याचे वाईट वाटले.