सुरुवातीच्या परिच्छेदांनंतरच शेवट काय असेल याचा अंदाज आला होता. तुमची शब्दकळा अप्रतिम आहे.  या कथेबाबत सांगायचे झाले तर स्क्रिप्टपेक्षा डायलॉग भारी असे झाले आहे.

कलेचा बाजार असे चोखपणे म्हणायलाही जीभ वळत नाही. आत्ता सादर केले तसले हीण तुम्ही केदार रागाचा अंतिम शब्द म्हणून जाहीर करणार. आणि ते का? तर उष्ट्या किडक्या शब्दकल्पनांची सालपटे चिकटवून कावळ्याचा मोर करू पाहणारे भाट त्याची थुंकी झेलतात म्हणून? मग तुमची गरजच काय? कुणीही उठावे आणि सुचेल त्या नावाचा आपल्या कपाळावर टिळा रेखून घ्यावा. रागांरागांतील फरक काय, एकाच रागाच्या विविध रूपांमधले वैविध्य कसे उमटते याची नाहीतरी कुणाला काळजीच नाही. "

क्या बात है!!...