माझी वैयक्तिक पसंती सुक्या भेळीला असली तरी ओली भेळ खाताना स्टीलचा चमचा वापरल्याने स्वाद थोडा कमी होतो असे वाटते. साधारण कार्डबोर्डइतक्या जाड कागदाचा छोटासा तुकडा घेऊन त्याने भेळ खावी. आमचा भेळवाला जुन्या मासिकांची कव्हरे वगैरे वापरत असे. अशी खाल्लेली भेळ जास्त चविष्ट लागते. ओल्या भेळीने तो कागदी चमचा मऊ पडेपर्यंत भेळच संपत असल्याने तशी काळजी नसते.